आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीजमध्ये खूप गुणकारी औषध आहे भेंडी, अशा पद्धतीने करा USE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - भेंडी खाण्यास चविष्ट तर असतेच, त्याच बरोबर तीच्यात अनेक गुणकारी औषधीसुध्दा आहेत. भेंडी भारतात सर्वाधीक पसंद केल्या जाणार्‍या भाज्यांपैकी एक आहे. याचे वानस्पतीक नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंट्स असे आहे.
सामान्यतः लोक याला एक भाजी म्हणूनच पाहतात. मात्र आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. भेंडीमध्ये विटामिन आणि खनिजांसोबतच विटामिन ए,बी,सी, ई व के आणइ कॅल्शिअम, लोह आणि जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते.
मधुमेहाच्या आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची अर्ध शिजलेली भाजी खाणे आवश्यक आहे. डांग-गुजरात च्या हर्बल तज्ज्ञांच्यामते ताजी हिरवी भेंडी डायबेटीज रुग्णांसाठी खुपच फायदेशीर आहे.
भेंडीबद्दल अत्यंत फायदेशीर, महत्त्वाची माहिती आणि पारंपरीक हर्बलची माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य (संचालक, अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद).

डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून भारतातील दूरवर पसरलेल्या आदिवासी गावांतील उदा. पातालकोट (मध्यप्रदेश), डांग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) आदीवासींच्या पारंपरिक ज्ञानाला एकत्रकरून त्याला आधुनिक विज्ञानच्या साह्याने जोडण्याचे कार्य करत आहेत.
(सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत)
कसा करायचा वापर हे पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....