आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहरा उजळवण्‍यासाठी करा हा घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍यांचा चेहरा उदास आणि थकल्‍यासारखा वाटतो असे लोक चेहरा उजळवण्‍यासाठी व चेह-यावर प्रसन्‍नता आणण्‍यासाठी अनेक खर्चीक उपाय करतात. मात्र त्‍यांच्‍या चेह-यावर टवटवीतपणा दिसत नाही. विविध कॉस्‍मेटिक्‍स क्रिमचा वापर केल्‍यानंतरही चेहरा उजळत नाही. अशा वेळी आरोग्‍याकडे लक्ष देणे गरजेचे असते. निरोगी आरोग्‍य राहिले तर चेहरा नेहमी प्रसन्‍न राहतो. चेहरा आनंदी दिसण्‍यासाठी 'योगा' मध्‍ये एक आसन सांगण्‍यात आले आहे. हे आसन नियमीत केल्‍यांनतर तुमचा चेहरा उजळल्‍याशिवाय राहणार नाही. या आसनाला सर्वांगासन म्‍हणतात.
सर्वांगासन करण्‍याची पद्धत-
जमिनीवर आंथरून टाकून त्‍यावर झोपा. दोन्‍ही हात कंबरेजवळ ठेवा. दोन्‍ही पाय सोबत वरती उचला. हाताच्‍या मदतीने खांद्यापर्यंतचा शरीराचा सर्व भाग वरती उचला. छातीला हणूवटी लागेपर्यंत पाय वरती सरळ ठेवा. श्वास मंदगतीने घ्‍या. काही काळ या अवस्‍थेत राहिल्‍यानंतर सावकाश पाय जमिनीवर ठेवा. शवासनच्‍या स्थितीमध्‍ये शरीर आल्‍यांनतर शक्‍य असेल तर परत ही प्रक्रिया करा. सर्वांगासन करते वेळी डोळे मात्र बंद करू नका. सर्वांगासन नियमीत केल्‍यानंतर चेहरा उजळतो. शिवाय चेह-यावर टवटवीतपणा येतो.
खबरदारी
हे आसन करते वेळी घाई-गडबड करू नका. पाठ दुखी, कंबरदुखीचा त्रास असणा-या व्‍यक्तिने सर्वांगासन करू नये.