आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजन आणि तणाव कमी करतो योगा, जाणून घ्या महिलांशी संबंधित खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगाचे अनेक फायदे आहेत. एका नव्या संशोधनात हे समोर आले आहे की महिलांचे वजन आणि तणाव कमी करण्यात ही प्राचीन कला अत्यंत उपयोगी ठरते.
1- तणाव कमी होईल : योग केल्याने सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिमला आराम मिळतो. ज्यामुळे अस्वस्थ होण्याचे कमी होते. नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंट्री अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या संशोधकांचे म्हणणे आहे की दररोज योगा केल्याने तणाव कमी होण्यासोबत एकाग्रता वाढते आणि जागरूकता येते.
2- भूक कमी : काही संशोधनांचे अहवाल सांगतात की क्रोनिक स्ट्रेसने त्रस्त लोक जास्त कॅलरीचा आहार घेत असतात. योगामुळे तणाव कमी होतो आणि असे खाद्यपदार्थ खाण्याची सवयदेखील राहत नाही.
3- पोटाच्या चरबीत घट : योगामुळे कार्टिसोल नावाच्या हार्मोन्सची पातळी कमी होते. हा हार्मोन्स पोटात चरबी जमा होण्यासाठी जबाबदार ठरत असतो.
4- आनंदी राहाल : योगा नैराश्याच्या लक्षणांना दूर करतो. यामुळे तुम्ही आनंदी आणि कार्यरत राहता.
5- चांगली झोप : एका संशोधनानुसार योग करणार्‍या लोकांना झोपेचा त्रास होत नाही. गडद झोप येते.
पुढे वाचा, ऑफिसपेक्षा घरात जास्त तणाव असतो महिलांसाठी...