आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली केस पिकण्‍यावर करा हा साधा आणि सोपा घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्य ही एक प्रत्‍येकाला निसर्गाने दिलेली देणगी असते. त्याचा वारसा आपल्याला आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून मिळालेला असतो. चाफेकळी नाक, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, गालावरची खळी किंवा नाजूकसा तीळ... अशी सौंदर्य खुलवणारी वैशिष्ट्ये मिळणे काही आपल्या हातात नसते आणि कधी कधी तर हे सगळे ज्‍या व्‍यक्‍तीला मिळाले आहे ती व्‍यक्‍ती सुदंर दिसेलच असे नाही. सुदंर दिसण्‍यासाठी मुलायम- चमकदार केस, पाणीदार डोळे, सतेज- नितळ त्वचा आणि पांढरीशुभ्र दंतपंक्ती असायला हवी. सुदंर दिसण्‍यामध्‍ये केस हा महत्‍वाचा भाग मानला जातो. ज्‍या व्‍यक्तिचे चमकदार आणि काळे केस आहे तो व्‍य‍क्‍ती इंतरांपैक्षा उठून दिसतो. उतार वयात केस पिकणे ही सर्वसाधारण बाब मानली जाते. मात्र वयाच्‍या 35 वर्षाच्‍या आगोदरच केस पिकत असतील तर ती चिंतेची बाब मानायला हवी. तारूण्‍यांत केस पिकत असतील तर त्‍यामुळे तुमच्‍यातला आत्‍मविश्वास कमी होतो. पाढं-या केसाची चिंता डोक्‍यात शिरते.
अकाली केस पिकण्‍याची कारणे
प्रमाणापेक्षा जास्‍त कॉफीचे सेवन. शरीरात अल्‍कोहोलचे प्रमाण वाढल्‍यांनतर. वारंवार आंबट खाद्यपदार्थ खात राहणे. याशिवाय मानसिक तनावात असाल तर केस पिकतात. जास्‍त काळ औषध घ्‍यावे लागत असेल किंवा धूम्रपान करत असाल तर केस पिकतात.
काय कराल उपाय -
अदरक आणि मधाचे मिश्रण करून कमीत-कमी आठवड्यातील दोन दिवस हे मिश्रण केसाला लावा. जास्‍वंदाच्‍या फुलाचा रस आणि किंवा पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यानंतर केस पिकने आणि गळणे बंद होते.
या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहेत डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.
काय कराल उपाय वाचा पुढील स्‍लाईडवर...