आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलेसुध्दा आहेत बहुगुणी औषधे, हे आहेत फुलांचे काही रामबाण USE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलांचे सौंदर्य आणि त्याचा सुगंध आपल्याला मंत्रमुग्ध करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? तुम्ही फुले खाऊसुध्दा शकता. फुलांचा खाण्यात वापर केला जातो मात्र तो अप्रत्यक्षरित्या असतो. कधी-कधी आपण फुले सलाडमध्ये वापरतो.
हजारो वर्षांपासून आपण फुलांच्या सुगंधांचा आनंद घेतो. त्यांच्या रंगात अनेक बहुगुण दडलेले असतात. आतापर्यंत लोकांना त्याचे अत्तर बनवण्याची कल्पना ठाऊक होती. मात्र फुल खाण्याससुध्दा उपयोगी असते. चला जाणून घेऊया अशा काही फुलांविषयी जे आपल्या जेवणाला स्वादिष्ट बनवतात.
जास्वंदाचे फुल
या फुलाचा उपयोग सलाडला गार्निश करण्यासाठी होतो. याव्यतिरिक्त चहामध्येसुध्दा जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो. या फुलामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-अ‍ॅक्सिडेंट आढळते. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.