आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारात या भाजीचा वापर केल्‍यानंतर तुम्‍हाला स्‍पर्शही करणार नाही आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपळ्याची भाजी आहारात वापरली जाते, मात्र ही भाजी सर्वांना आवडत नसल्‍यामुळे आहारात भोपळ्याच्‍या भाजीचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात वापर केला जात नाही. आरोग्‍यासाठी भोपळ्याची भाजी लाभदायक असते, यासंदर्भात माहिती नसल्‍यामुळे आहारात या भाजीचा वापर केला जात नाही. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍याबरोबरच विविध आजारांवर उपाय करण्‍यासाठी भोपळा लाभदायक ठरतो. भारत देशात विविध राज्‍यात भोपळ्याच्‍या वेगवेगळ्या प्रजाती पहायला मिळतात. भोपळ्याचे विविध आकार असल्‍यामुळे विविध भाषेत भोपळ्याची वेगवेगळी नावे आहेत. उपवासासाठी फराळ म्‍हणून भोपळ्याचा आहारात उपयोग केला जातो.
अंटार्क्‍टिका खंडामध्‍ये विविध प्रकारच्‍या भोपळ्याच्‍या प्रजाती पहायला मिळतात. भोपळ्याचा शोध सर्वात अगोदर लॅटीन अमेरिकेत लागला. इ.स.पुर्व 7000 ते 8000 वर्षापूर्वीपासून भोपळ्याच्‍या विविध प्रजाती उपलब्ध असल्‍याचे तज्ज्ञाचे मत आहे. भारत,चीन, मॅक्सिको, अमेरिका या देशात भोपळ्याचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन केले जाते. पोट, हृदय, मुत्रपींडाचे आजारावर भोपळा लाभदायक उपाय म्‍हणून वापरला जातो. भोपळ्याचा रस आरोग्‍यासाठी लाभदायक असल्‍याचे आर्युवेदात सांगण्‍यात आले आहे.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...