आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्‍हाळ्यात अंगाची होणारी लाही लाही थांबवण्‍यासाठी साध्‍या-सोप्‍या टिप्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यावरणाचा -हासामुळे सातत्याने होणा-या तापमानवाढीचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. प्रत्‍येकवर्षी उष्माघातामुळे सर्वाधिक बळी जात आहेत. याशिवाय उन्‍हांळी लागण्‍याबरोबरच डिहायड्रेशनमुळे अशक्‍तपणा येणा-या रूग्‍नांचे प्रमाण वाढत आहे. आजारापासून बचाव करण्‍यासाठी आम्‍ही आज काही साध्‍या टिप्‍स तुम्‍हाला सांगणार आहोत. या टिप्‍सचा योग्‍य पध्‍दतीणे वापर केला तर तुम्‍हाला आजाराचा सामना करावा लागणार नाही. उन्‍हापासून बचाव करण्‍यासाठी काय कराल उपाय जाणून घ्‍या काही महत्त्वाच्‍या टिप्‍स.
जास्‍त पाणी पिणे- पाण्‍यामुळे त्‍वचेला झळाळी येते. उन्‍हाळ्यात दिवसभरामध्‍ये कमीत-कमी आठ ग्‍लास पाणी प्‍यायला हवे. जर उन्‍हाळ्यात थकवा आल्‍यासारखे वाटत असेल तर तोंडावर दोन-तीन वेळा थंड पाणी टाका. यामुळे थकवा येत नाही.
चंदनाचा लेप- चंदनाचे पावडर, तुळस आणि गुलाब याचा लेप चेह-याला लावल्‍यानंत शरीरातील उष्‍णता कमी होते.
चिंचोके- चिंचाच्‍या बिया( चिंचोके) वाटून घ्‍या. चिंचोक्याच्‍या पाण्‍यात साखर टाकून प्‍यायल्‍यानंतर शरीरातील उष्‍णता कमी होते.
पुढील स्‍लाईडवर वाचा आणखी माहिती...