आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत्रीच नव्हे, सालसुध्दा आहे बहुउपयोगी, हे आहेत टॉप 10 USES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत्री एक गुणकारी फळ मानले जाते. मुले असो अथवा जेष्ठ सर्वांनाच संत्रीचा स्वाद आवडतो. लोक संत्री तर खातात परंतु त्यांना त्याचे गुणधर्म आणि फायदेसुध्दा ठाऊक नसतात. म्हणून काही लोक संत्री तर खातात परंतु त्याच्या सालांचे त्यांना महत्व नसते. निरोपयोगी म्हणून फेकून देतात. याव्यतिरिक्त काही लोक या सालांचा उपयोग एन्जॉय म्हणून एकमेकांच्या डोळ्यात टाकण्यासाठी करतात.
परंतु या संत्रीच्या सालीपासून अनेक फायदे असतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे. संत्रीच्या सालीचे तुम्हाला गुणकारी फायदे ठाऊक झाले तर तुम्हीसुध्दा त्याचा उपयोग नक्कीच आमलात आणाल.
लठ्ठपणासाठी फायदेशीर आहे
एका संशोधनानुसार, जर कुणाला लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यांच्यासाठी संत्रीची साल गुणकारी सिध्द होऊ शकते. संत्रीच्या सालीमध्ये लठ्ठपणा आटोक्यात आणण्याची क्षमता असते. सोबतच, कर्करोग आणि हड्यांच्या ठिसूळपणासारख्या समस्यांवर विशेष रुपात लाभदायक आहे.
पचनशक्ती वाढवते
संत्रीच्या सालीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता असते. यामुळे भूख वाढते. पचनक्षमता, गॅस, अ‍ॅसिडिटी, मळमळ आणि हार्ट बर्नसारख्या समस्यांवर ही साल रामबाण उपाय आहे. सोबतच, संत्रीची साल कृमिला नष्ट करण्यास मदत करते. म्हणून या सर्व आजारांच्या लोकांना संत्रीच्या सालीचे पावडर बनवून दिल्यास त्याचा फायदा होतो.