आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा छोटासा 'योगा' केल्‍यानंतर वारंवार पाणी पिण्‍याची भासणार नाही गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकाच्‍या श्‍ारीरात मुबलक प्रमाणात पाणी असणे आवश्‍यक आहे. आजारी पडल्‍यानंतर जास्‍तीत-जास्‍त पाणी पिण्‍याचा सल्ला डॉक्टर देतात. शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी जास्‍तीत-जास्‍त पाणी पिणे आवश्‍यक आहे. पाणी शरीराला योग्‍य प्रमाणात मिळाले तर व्‍यक्ति प्रसन्न राहतो. जर तुम्‍हाला शरीरासाठी लागणारे पाणी योग्‍य प्रमाणात मिळत नसेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजारी पडतो.
शरीरातील तरलता वाढवण्‍यासाठी योग शास्‍त्रामध्‍ये एक मुद्रा सांगण्‍यात आली आहे. या मुद्रेला वरूण मुद्रा असे म्‍हटले जाते. ही मुद्रा नियमीत केल्‍याने निरोगी शरीरासाठी लाभदायक ठरते. जाणून घेऊया वरूण मुद्रेविषयी.
पद्धत- डाव्‍या हाताच्‍या करंगळीला कनिष्‍ठा म्‍हटले जाते. कनिष्‍ठाला जल तत्त्वाचे प्रतिक मानले जाते. जल तत्त्व व अग्‍नी तत्त्वाच्‍या संयोगातून परिवर्तन घडते. करंगळीचा अग्रभाग आणि अगंठ्याचा अग्रभाग मिळविल्‍याने वरूण मुद्रा तयार होते.
खबरदारी- हिवाळ्यात वरूण मुद्रा जास्‍त वेळ करू नये. अन्‍य ऋतुमध्‍ये कमीत-कमी 24 मिनिट हा प्रयोग करावा. जास्‍तीत-जास्‍त 48 मिनिट हा प्रयोग करता येईल.
वरूण मुद्रेचे लाभ-
त्‍वचा नितळ होते.
शरीरातील पाण्‍याची मात्रा संतुलीत राहते.
त्‍वचा रोग बरे होतात.
रक्‍त शुध्‍द होते.