आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दह्यात आहे विविध गुणांचे भांडार, दूर होतो अ‍ॅसिडिटीचा त्रास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आहारात निश्चितपणे सामील करावे असे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही हा त्यापैकी एक पदार्थ असून त्यात अनेक महत्त्वाचे गुण आहेत. दही आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत, पण त्याचसोबत सौंदर्य वाढवण्यात देखील हा महत्त्वाची भूमिका निभावतो.

विविध गुणांचे भांडार
दह्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. दुधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे दह्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस सुद्धा चांगल्या संख्येत असते.