आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वृद्धापकाळातील आजारांच्या विळख्यात तरुण पिढी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मरणशक्तीचा अभाव, एखादी गोष्ट लवकर विसरणे, हृदयविकार, नैराश्य, पार्किन्सन हे वृद्धापकाळात होणारे आजार असा सर्वसाधारण समज, पण आता ऐन तारुण्यात वृद्धापकाळात होणारे आजार होत आहेत. वाढत्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुण पिढी स्वत:ला या स्पर्धेत झोकून देत आहे. परिणामी ते आहार, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासोबत सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा तणाव, यशस्वी होण्याचा दबाव त्याच्यावर असतो. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे संशोधकांनी केलेल्या विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. आधुनिक जीवनशैली आणि त्याच्या परिणामावर झालेल्या विविध अभ्यासातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की तरुण पिढी अकाली प्रौढ होत आहे. आरोग्यदायी जीवनपद्धती अवलंबल्यास असे आजार टाळता येतील, असा सल्ला तज्ज्ञ देतात.