आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Urine Stone, Kidney Disease, Tribal Remedies, Human Body,

युरीन स्‍टोन आणि किडनीच्‍या आजारापासून सुटका मिळवण्‍यासाठी करा हे आदिवासी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनी, मुत्राशय यामध्‍ये स्‍टोन तयार होणे हा काही नविन आजार राहिलेला नाही. विविध रसायनापासून तयार झालेले छोटेछोटे कण( क्रिस्‍टल्‍स) एकत्र जमा झाल्‍यानंतर किडणी स्‍टोन तयार होतो.
स्‍टोन - कॅल्शियम फॉस्‍फेट, कॅल्शियम ऑक्सोलेट, यूरिक अ‍ॅसिड, आणि अमोनियम फॉस्‍फेट यासारख्‍या रसायनापासून स्‍टोन तयार होतो. जड पाणी आणि क्षारयुक्‍त पाण्‍यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्‍यानंतर किडणी स्‍टोन होण्‍याचा धोका जास्‍त असतो.

किडणी स्‍टोनचे लक्षणे- पोटात आचानक कळ निघणे. सातत्‍याने पोट दूखणे. जळजळ होणे. उलटी होणे. लघवीसोबत रक्‍त येणे याला हिमेटूरिया म्‍हटले जाते. वारंवार लघवी येणे ही स्‍टोन होण्‍याची लक्षणे आहेत.
एका अहवालानूसार किडणी स्‍टोन असणा-यांची संख्‍या भारतामध्‍ये 70 लाख आहे. पंजाब, हरियाणा, राजस्‍थान आणि गुजरात या राज्‍यांना स्‍टोन बेल्‍ट म्‍हणून ओळखले जाते. आधुनिक मशिन्‍सच्‍या सहाय्याने स्‍टोन बरा करण्‍याचा दावा केला जात असला तरी तो खर्च सर्वसामान्‍य लोकांना झेपण्‍यासारखा नाही. तंत्रज्ञाचा उपयोग केल्‍यानंतरही स्‍टोन पूर्णपणे बरा होईल याची खात्री देता येत नाही. विविध आजारांवर हजारो वर्षापासून आदिवासी परंपरागत औषधी वनस्‍पतीपासून उपाय करत आले आहेत. स्‍टोनसह इतर आजारांवर आदिवासी करत असलेले उपाय काय आहेत, याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देणार आहोत.
द्राक्ष आणि तरवटाच्‍या बी सम प्रमाणात घेऊन (6 ग्रॅम) बारीक वाटून घ्‍या. नंतर हे मिश्रण गरम पाण्‍यात 30 मिनिट उकळून घ्‍या. हे मिश्रण थंड झाल्‍यानंतर दिवासातून कमीत-कमी दोन वेळेस स्‍टोनचा आजार असणा-या व्‍यक्तिने प्‍यायल्‍यानंतर स्‍टोनपासून सुटका मिळू शकते.
या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहेत डॉ दीपक आचार्य (संचालक-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.
पुढील स्‍लाईडलवर वाचा स्‍टोनवरचे उपाय...