Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | a-fire-that-burns-a-lot

मनुष्याला पापी संबोधणे, हेच सर्वात मोठे पाप

धर्म डेस्क | Update - Jul 30, 2011, 08:18 PM IST

स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एका सुंदर प्रसंगातून आपल्याला ही बाब अधिक स्पष्टपणे आकलन होईल.

 • a-fire-that-burns-a-lot

  पाप पुण्यासंबंधी अनेक गोष्टी नेहमी आपल्या ऐकण्यात येतात. काही लोक ज्या गोष्टीला पाप म्हणतात, तीच गोष्ट एखादे वेळी अन्य प्रांतात पुण्य असू शकते. जी गोष्ट एखाद्या ठिकाणी कर्तव्य असेल तीच गोष्ट दुस-या एखाद्यासाठी पाप किंवा नीच कृत्य असू शकते.
  परंतु पापाची शाश्वत व्याख्या करायची असेल तर असे म्हणता येईल की आपल्या स्वार्थासाठी दुस-याला धोका देणे म्हणजे पाप. दुस-याच्या आत्मसन्मानाला पायदळी तुडविणे म्हणजे पाप.
  स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एका सुंदर प्रसंगातून आपल्याला ही बाब अधिक स्पष्टपणे आकलन होईल.
  स्वामी विवेकानंद हे आपल्या अमेरिकेच्या प्रवासातून भारतात परतत होते. त्यांच्या भाषणांनी अमेरिकेला एक प्रकारे आंदोलित केले होते. त्यांच्या सभांना खचाखच गर्दी व्हायची. त्यांच्या व्याख्यानांतून जणु तोफगोळेच बाहेर पडायचे. लोकांच्या अंधविश्वासांवर आणि अवैज्ञानिक रुढींवर स्वामीजी तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक विश्लेषणांनी प्रहार करायचे. एखाद्या ख्रिश्चन देशात जाऊन एक हिंदू सन्याशी किती धैर्याने आणि साहसाने अध्यात्माची पताका फडकावत होता, याची आज कल्पनाही करता येणार नाही.
  ख्रिश्चन श्रोत्यांसमोर उभे राहून हा योद्धा संन्याशी गर्जना करायचा की, ''पश्चाताप किंवा कन्फेशन करू नका. पश्चाताप करू नका... आवश्यकच असेल तर पश्चाताप थांबवा. पुढे चला, आणखी पुढे चला... पश्चाताप करून स्वताला बंधनात टाकू नका. आपल्या पवित्र, चिरमुक्त आणि परमात्म्याचे साकार रूप आत्मा आहे. त्याला जाणून घ्या. मनुष्य हा पापी नाही. एखाद्याला पापी म्हणणे म्हणजे ईश्वराची निंदा करणे होय. तुम्ही सारे संमोहित आहात, त्यातून बाहेर पडा. ध्यानात ठेवा की तुम्ही ईश्वराचे दिव्य संतान आहात. आपली महानता आणि दिव्यता सदैव ध्यानात ठेवा. त्या दिव्यतेनुसारच तुमचे जीवन असले पाहिजे.
  स्वामी विवेकानंदांनी मांडलेले हे उपनिषदांतील तेजस्वी विचार लोकांच्या हृदयाचा ठाव घेणारे होते. म्हणूनच या आध्यात्मिक विचारांचा फैलाव पाश्चात्य देशात दावानलासारखा झाला.  तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंदTrending