आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अधिक मासारंभ : ही व्रतवैकल्य केल्याने होईल पुण्यप्राप्ती...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत अधिक मास आहे. दर तीन वर्षांनी कोणता तरी महिना अधिक येतो. याला अधिक मास, पुरुषोत्तम मास, मल मास तसेच संसर्प मास असेही म्हणतात. यापूर्वी भाद्रपदामध्ये अधिक मास 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 मध्ये आला होता. यानंतर हा योग 2031 मध्ये आहे. अधिक मासामुळे यंदा सणांबरोबर श्राद्धपक्षही एक महिना पुढे गेले आहे. एवढेच नव्हे तर यामुळे लग्नाचे मुहूर्तही एक महिना उशिराने येणार आहेत. या माहिन्यात प्रामुख्याने श्राद्ध, स्नान व दान ही तीन कर्मे केली जातात.