आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार राग येणे, हा एक प्रकाराचा मानसिक आजारच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राग व्यक्त करणे म्हणजे सामान्य अभिव्यक्ती होय; परंतु त्याचे सवयीत रूपांतर झाल्यास चांगले नाही. तज्ज्ञांच्या मते हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. हा आजार नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा पीडितासोबतच हा आजार इतरांसाठीही अडचणी निर्माण करण्याचे कारण ठरू शकतो. रागावर नियंत्रण मिळवण्याच्या काही सोप्या पद्धती जाणून घेऊया..
• सर्वप्रथम राग येण्याची कारणे ओळखावीत. जर एखाद्या परिस्थितीत किंवा एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला राग येत असेल तर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
• एखादा मित्र किंवा सहकार्‍याशी झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करा किंवा एकमेकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. जर असे केले नाही तर यामुळे तणाव, अनिद्रा आणि चिडचिड होऊ शकते.
• राग आल्यावर कधीही असभ्य शब्दांचा वापर करू नये. कारण यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. अशा स्थितीत मानसोपचारतज्ज्ञांकडून काउंसेलिंग करवून घेणे आवश्यक आहे.
• अधिक तणावयुक्त वातावरणात राहणे किंवा काम करण्यामुळेसुद्धा स्वभाव चिडचिडा होतो आणि प्रवृत्ती रागीट होऊ लागते. अशावेळी संगीत ऐकावे, पुस्तके वाचावीत, चित्रपट पाहावा, स्वीमिंग किंवा योगासन करावे. यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि मुडही चांगला राहील.
• जर तुम्ही कामाचा दबाव आणि ओव्हरटाइमने त्रस्त आहात तर हे कारणसुद्धा तुमच्या रागासाठी जबाबदार ठरू शकते.
• टाइम मॅनेजमेंटच्या अभावाने कोणतेही काम वेळेवर होत नसल्यास पीडिताची प्रवृत्ती रागीट बनते. गृहिणींनी वेळेबाबत विशेष लक्ष ठेवावे, कारण त्यांना दुहेरी भूमिका बजावावी लागते.