आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayurveda spoonful of turmeric advantages you will be amazed to learn

चमचाभर हळदीचे फायदे ऐकाल तर हरखून जाल!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. विशेषत: मधुमेही रूग्‍णांसाठी हळद हे औषधापेक्षाही जास्‍त गुणकारक आहे. मधुमेह असणा-या लोकांनी दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्‍यावे. हळदीमध्‍ये वातनाशक गुण असल्‍यामुळे मधुमेहाची समस्‍या असणा-यांना याचा चांगलाच फायदा होतो.

घरामध्‍येच छोटे-छोटे प्रयोग करून त्‍याचे विविध लाभ घेता येतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्‍यामुळे रक्‍त शुद्ध होते. महिलांना मासिक पाळीच्‍या वेळेस येणा-या अडचणी दूर होतात. हळद यकृतासंबंधीच्‍या आजारांवरसुद्धा गुणकारी मानले जाते. त्‍यामुळेच सर्दी-खोकला झाल्‍यास दूधात हळद घालून पिण्‍यास सांगितले जाते. हळद कायम हवाबंद डब्‍यात ठेवली पाहिजे. हवाबंद डब्‍यात ठेवल्‍यामुळे हळदीचा स्‍वाद आणि त्‍याची गुणवत्ता कमी होत नाही. पोटात जंत झाले असतील तर एक चमचा हळद पावडर दररोज सकाळी एक आठवडाभर पाण्‍याबरोबर घ्‍यावे. त्‍यामुळे पोटातील जंत नष्‍ट होतील.

चेह-यावरील डाग, सुरकत्‍या नष्‍ट करण्‍यासाठी हळद आणि काळे तीळ समप्रमाणात घेऊन त्‍याची पेस्‍ट बनवून चेह-यावर लावावी. हळद-दूधाची पेस्‍ट चेह-यावर लावल्‍यास त्‍वचेचा रंग उजळतो. खोकला आल्‍यास हळदीचा छोटासा तुकडा चघळावा. त्‍यामुळे खोकला कमी होतो. त्‍वचेवरील नको असलेले केस हटवण्‍यासाठी कोमट खोबरेल तेलात हळद पावडर टाकून त्‍याची पेस्‍ट करून हातापायावर लावावे. त्‍यामुळे त्‍वचा मुलायम तर होतेच त्‍याशिवाय त्‍यावरील नको असलेले केसही हळूहळू कमी होतात.
या लोकांकडे असेल पैसाच पैसा, सर्वकाही असेल एकदम छान