आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-याला आपल्याकडे आकर्षित करण्याचे मार्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही तुमच्या जीवनावर निस्सीम प्रेम केले तरच त्या बदल्यात तुम्हालाही प्रेम मिळेल. म्हणून जीवनावर मनसोक्त प्रेमाचा वर्षाव करा. अन्य लोकांना तुमच्या अवतीभोवती प्रेमाचा वावर किंवा तुमच्यात काही चांगल्या गोष्टी दिसू लागल्या तर ते स्वत: होऊन तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यासाठी तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू शकता-
० तुमचे हायपॉइंट म्हणजेच तुमची खासीयत लक्षात ठेवा. त्यामुळे अन्य लोकांपेक्षा तुमचे वेगळेपण राहील.
० करिअरमध्ये अवघड निर्णय घ्यायला घाबरू नका. त्यामुळे तुम्हाला हवे तसेच होत राहील.
० पुढे जाण्यासाठी दुस-याला संधी द्या.
० दुस-याला प्रोत्साहन द्या. त्यामुळे तुमचाही आत्मविश्वास वाढेल.
० कोणाच्याही काड्या करू नका. दुस-याच्या बाबतीत चुकीचा निर्णय देऊ नका. हे काम पायाजवळ पाहणा-या लोकांचे आहे. उच्च विचाराचे लोक नेहमीच नव्या कल्पनांच्या शोधात असतात, हे ध्यानात ठेवा.
० लवचीक राहा. तुमचे मन मोकळे ठेवा. दुस-याचे ऐकून घ्या. चांगले विचार आत्मसात करा.
० तुमचे काम संपूर्ण उत्साहाने आणि मन लावून करा.
० नव्या संधींचा तात्काळ स्वीकारा. उद्या काय होईल हे तुम्हाला अजिबात माहीत नाही. आणि हीच बाब तुमच्या जीवनाचा प्रवास रोमांचक बनवेल.