आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता देऊ नये कारण...

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मदिन हा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. म्हणूनच या दिवशी आपण उत्साहात असतो. वाढदिवस साजरा करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्यक्ती भावनिकरीत्या आपल्याशी जोडलेला असतो. त्यामुळे आजकाल नातेवाईक असू द्या की जवळच्या मित्रमैत्रिणी, त्यांच्या वाढदिवशी आपण शुभेच्छा देतो. परंतु लवकर शुभेच्छा देण्याच्या नादात रात्री 12 वाजता शुभेच्छा देण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. विशेषत तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
परंतु आपण आपले शास्त्र आणि धर्म समजून घेतले तर ध्यानात येईल की, ही पद्धत खूपच चुकीची आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्कम शक्तीदेखील अधिक प्रभावी असतात. त्यामुळे रात्री 12 वाजता दिलेल्या शुभेच्छा फलदायी नसतात. हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. सकाळची वेळ ही ऋषी मुनींच्या साधनेची असते. यावेळी वातावरणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयाच्या वेळी दिल्या गेलेल्या शुभेच्छा अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे जन्मदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता न देता सकाळी देणे चांगले.