Home | Jeevan Mantra | Dharm | buddhism in china tibet

जाणून घ्या... बौद्ध मताचा प्रसार चीनमध्ये झाला कसा ?

दिव्य मराठी | Update - Jul 12, 2011, 01:06 PM IST

चीन आणि तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ संबंध आहे.

  • buddhism in china tibet

    चीन आणि तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ संबंध आहे. प्राचीन काळी तिबेटमधील सत्ताधा-यांनी आपल्या अधिपत्त्याखालील विद्यापीठात नालंदा विद्यापीठातला स्नातक शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रघात पाडलेला होता. अशा शिक्षकांच्या प्रयत्नातूनच तिबेटच्या इतिहासातले सुवर्ण युग साकार झाले होते. त्यामुळे नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन येणार्‍यांना तिबेटमध्ये फार मान दिला जात असे.

    'नालंदा'मध्ये शिक्षण घेतलेल्या या पंडितांनीच बुद्ध धर्माची तत्त्वे तिथल्या भाषेत अनुवादित केली आहेत आणि त्यामुळेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला आहे. आठव्या शतकातला तिबेटचा राजा ड्यू त्सान याने तिबेटमध्ये धर्म प्रचारार्थ काही भारतीय पंडितांना पाचारण केले होते. आचार्य शांत रक्षित हे त्यातलेच एक होते. त्यांनी तिथे केलेल्या कार्याची पावती म्हणजे तिबेटी जनतेने त्यांना दिलेला 'आचार्य बोधिसत्व' हा सन्मान. हा संबंध अर्वाचिन काळातही जारी राहील. नालंदा विद्यापीठाचा हा ज्ञानाचा दिवा प्रज्ज्वलित ठेवणार्‍या दोन संस्था आजही भारतात आहेत. वाराणसीजवळील
    सारनाथ येथे असलेले 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज' आणि लेह (लडाख) येथील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज'. आता बिहारमध्ये नालंदा विद्यापिठाच्या पुनर्निर्माणाचे कार्य सुरु आहे.

Trending