आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जीवनात काही गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकते. काही जीव(प्राणी) असे आहेत ज्यांच्यापासून आपण नेहमी सावध राहिले पाहिजे. आपल्याला कोणत्या जीवांपासून आणि मनुष्यापासून सावध राहिले पाहिजे हे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे...
अहिं नृपं च शार्दूलं बरटि बालकं तथा।
परश्वानं च मूर्खं च सप्त सुप्तान्न बोधयेत्।।
या संस्कृत श्लोकात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, साप, राजा, लहान बाळ, डुक्कर, वाघ, दुस-याचा कुत्रा, आणि मूर्ख हे सात जीव झोपलेले असतील तर त्यांना झोपेतून उठवू नये किंवा जागे करू नये.
साप - आचार्य चाणक्य म्हणतात, जर तुम्हाला एखादा साप झोपलेले दिसला तर त्याच्याजवळ जाऊ नका. त्याला डिवचण्याचे धाडस करू नका. नाहीतर तुमच्यासमोर मृत्यूचे संकट उभे राहील. सर्वांना माहित आहे की, विषारी सापाने दंश केला तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे झोपलेल्या सापाला जागे करू नये.
राजा - चाणक्यनीती नुसार राजाला झोपेतून उठवण्याचे धाडस कोणीही करू नये. असे केल्यास राजाच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल.
वाघ - एखादा वाघ किंवा जंगली प्राणी झोपलेला असेल तर त्याच्याही जवळ जाऊ नका. अन्यथा तुमच्यासमोर मृत्यूचे संकट उभे राहील.
डुक्कर - एखादे डुक्कर झोपले असेल तर त्यालाही उठवू नका. नाहीतर सर्वत्र दुर्गंधी पसरेल.
लहान बाळ - एखादे लहान बाळ झोपले असेल तर त्याला झोपेतून उठवू नये, अन्यथा त्याला शांत करणे फार अवघड होईल.
दुस-याचा कुत्रा - तुम्ही कोणाच्या घरी गेला असाल आणि तिथे कुत्रा झोपलेला असेल, तर त्याला जागे करू नका. कुत्रा तुम्हाला चावण्याची शक्यता आहे.
मूर्ख - सातवा प्राणी आहे मूर्ख. एखाद्या मूर्ख व्यक्तीला जागे केले तर, त्याला समजून घेणे जवळपास असंभवच आहे. अशावेळेस वाद होण्याची शक्यता जास्त आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.