Home | Jeevan Mantra | Dharm | chant-dattatrey-mantra-on-evening-of-thursday-and-purnima-for-big-success

जीवनात यशस्वी होण्यासाठी करा दत्तात्रेय मंत्राचा जप

धर्म डेस्क | Update - Aug 11, 2011, 02:42 PM IST

दत्तात्रेय उपासनेत अहंभाव सोडून ज्ञानाने जीवन उजळवून टाकण्याचा संदेश आहे.

 • chant-dattatrey-mantra-on-evening-of-thursday-and-purnima-for-big-success

  हिंदू धर्म शास्त्रात भगवान दत्तात्रेयाला त्रिदेव म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव एकत्रित असलेले भगवान दत्तात्रेय हे एकमेव दैवत आहेत. महागुरू आणि महायोगी म्हणूनही दत्तात्रेय यांच्याकडे पाहिले जाते. भगवान दत्तात्रेय यांनी 24 गुरू केल्याचा शास्त्रांत उल्लेख आहे. यात मनुष्य, प्राणी आणि वनस्पतींचाही समावेश आहे. दत्तात्रेय उपासनेत अहंभाव सोडून ज्ञानाने जीवन उजळवून टाकण्याचा संदेश आहे. धार्मिक दृष्टीनेही दत्तात्रेय यांची उपासना मोक्षदायी मानण्यात आली आहे.
  भगवान दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पार्णिमेला संध्याकाळी झाला. त्यामुळे दत्तात्रेय यांची दर पौर्णिमेला उपासना करणे ज्ञान, बुद्धी आणि बल प्रदान करणारी आहे. शत्रूबाधा दूर करून आपल्या कार्यात सफलता मिळावी, यासाठीही भगवान दत्तात्रेय यांची उपासना केली जाते. भगवान दत्तात्रेय हे भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळेच गुरुवारी आणि पौर्णिमेला संध्याकाळी पुढील मंत्राचा जप करतात.
  गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी दत्त मंदिरात किंवा दत्त प्रतिमेसमोर बसून पुढील मंत्राचा यथाशक्ती जप करा.
  जगदुत्पत्तिकत्र्रेचस्थिति-संहारहेतवे।
  भवपाश-विमुक्तायदत्तात्रेयनमोऽस्तुते॥
  दत्तविद्याठ्य लक्ष्मीशं दत्तस्वात्म स्वरूपिणे।
  गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते।।
  आदौ ब्रह्मा मध्येविष्णुरन्तेदेव: सदाशिव:।
  मूर्तित्रय-स्वरूपायदत्तात्रेयनमोऽस्तुते॥
  किंवा पुढील मंत्राचा जप करा...
  ओम द्रां दत्तात्रेयाय स्वाहाTrending