Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | charanamrut, raight hand, jeevan mantra

चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवतात, असं का?

धर्मडेस्क. उज्जैन | Update - Jul 26, 2011, 01:16 PM IST

रणामृत घेतल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवणे हे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. परंतु हे खरे आहे. चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरविल्याने आपले विचार नकारात्मक होतात.

  • charanamrut, raight  hand, jeevan mantra

    मंदिरात प्रवेश केल्यापासून तर मंदिरातून बाहेर पडण्याच्या हिंदु धर्मात अनेक परंपरा आहेत. त्याचप्रमाणे चरणामृत उजव्या हाताने ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवण्याचा एक संस्कार रुढ झाला आहे. मात्र,चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरून हात फिरवणे, योग्य की अयोग्य? हे बहुतेकांना माहित नसते.
    चरणामृत घेतल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवणे हे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. परंतु हे खरे आहे. चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरविल्याने आपले विचार नकारात्मक होतात.
    शास्त्रानुसार, प्रसाद,चरणामृत उजव्या हाताने ग्रहण करावा. कारण कोणतेही धार्मिक कार्य असो ते आपण उजव्या हाताने करीत असतो. दानधर्म, यज्ञात आहुती देण्याचे काम आपण उजव्या हाताने करतो. उजव्या हाताने केलेले काम हे शुभ मानले जाते. चरणामृत उजव्या हाताने ग्रहन केल्याने आपल्याला जडलेले आजार दूर होतात.Trending