आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉफीचे गरजेपेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी घातक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्याच्या दृष्टीने कॅफीन निश्चित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते, परंतु गरजेपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते 200 ते 300 मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते, तसेच अनेक आजार होण्याची शक्यता कमी करण्यातही कॉफी फायदेशीर आहे. तसेच कॉफीमुळे आळसही निघून जातो. कॉफी कशी आणि कोणकोणत्या आजारांसाठी उपयुक्त आहे ते जाणून घेऊया..
अल्झायमर
एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे तीन कप कॉफीचे सेवन करतात, ते लोक अल्झायमर (दुबळी स्मरणशक्ती) ने पीडित होण्याची शक्यता 65 टक्के कमी होते. तज्ज्ञांच्या मते कॉफीचे सेवन केल्याने मेंदूत एकत्र होऊन अल्झायमर होण्यास कारणीभूत ठरणार्‍या प्रोटिनची निर्मिती मंदावते.
स्मरणशक्ती वाढवा
वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमजोर होणे स्वाभाविक आहे, परंतु जे वयोवृद्ध लोक नियमितपणे कॉफीचे सेवन करतात त्यांच्या मेंदूची कार्यप्रणाली अनियमित होण्याचा वेग मंदावतो. अशावेळी वारंवार विसरण्याची सवयही सुटू शकते.
गॉलस्टोन्स
ज्या महिला दररोज दोन-तीन कप कॉफीचे सेवन करतात त्या महिलांना गॉलस्टोन्समुळे शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या स्थितीचा 25 टक्के कमी सामना करावा लागतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे. अशा प्रकारे पुरुषांमध्ये गॉलस्टोनची शक्यता कमी केली जाऊ शकते.
कॅन्सर
ज्या महिला दररोज नियमितपणे तीन कप कॉफी पितात त्यांना कोलोन कॅन्सरचा धोका कमी असतो, परंतु ज्या महिला कॉफीचे सेवन करत नाहीत त्यांना हा धोका जास्त असतो. जपानच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात यास दुजोरा देण्यात आला आहे. तसेच 2007 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जे लोक दररोज एक कप कॉफी पितात त्यांना पाíकन्सन डिसीजचा धोका 50 टक्के कमी असतो.
संधिवात
जे लोक नियमितपणे तीन-चार कप कॉफीचे सेवन करतात त्या लोकांमध्ये संधिवात असण्याची शक्यता 40 टक्के कमी असते. तसेच दोन कप कॉफीमुळे लिव्हर सोरायसिसचा धोका 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
स्ट्रोक/हृदयरोग
तीन कप कॉफीचे दररोज सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका 20 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो, असे 2009 मध्ये झालेल्या एका संशोधनात आढळले. कॉफीत असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कार्यप्रणाली चांगली राहते आणि त्यामध्ये सूज येत नाही. एका संशोधनानुसार ज्या महिला दोन-तीन कप कॉफीचे सेवन दररोज करतात त्यांना हृदयरोगांमुळे जिवाला होणारा धोका 25 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.