आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभवातही आनंद मानून योग्य धडा घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगला परफॉर्मन्स देण्याच्या नादात बहुतेक वेळा लोक आत्मविश्वास गमावून बसतात. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुढील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वत:ला प्रोत्साहित करू शकता-
* ध्येय निश्चित करा, मात्र ते गाठताना थोडी लवचीकताही ठेवा. तुमच्या ध्येयापेक्षाही महत्त्व प्राप्त होईल अशी कोणतीही योजना डोक्यातही आणू नका.
* आतापर्यंत तुम्ही ज्या मर्यादा आखून घेतल्या होत्या, त्यांचा विस्तार करा. आजपर्यंत मिळालेल्या यशावरून ते कसे मिळवले, याची जाणीव तुम्हाला असते. क्षमतांच्या विकासातून स्वत:चा विकास घडवा.
* नेमकेपणा येण्याची प्रतीक्षा करत बसू नका. जे काम करायचे आहे त्याला तत्काळ सुरुवात करावी. जे हाती येणे अशक्य आहे, त्याच्या मागे न धावता विशिष्टता संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
* एखादी गोष्ट तुम्हाला मिळवता आली नाही, त्यापासून महत्त्वपूर्ण धडा घ्या. तुम्हाला आलेल्या अपयशातही आनंद माना. ज्या विषयात तुम्ही स्वत:ला कमी आहात असे तुम्हाला वाटते, त्यासाठी वेळ द्या.
* यश नेहमी गांभीर्याने घ्या. ध्येय हा प्राप्तीचा आत्मा आहे. त्यामुळे ‘प्रयत्न करू’ असे म्हणून कोणत्याही कामाची सुरुवात करू नका. ‘मीच करतो’ असे म्हणा.
* क्षणिक ध्येय बाळगू नका. ध्येय हा यशाचा आत्मा आहे. त्यामुळे कोणतेही काम ‘मी प्रयत्न करतो’ म्हणून सुरू करू नका तर ‘मीच करणार’ असे म्हणूनच कामाची सुरुवात करा.