Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | concept of aparigrah

अशांतीपासून दूर राहण्यासाठी समजून घ्या अपरिग्रह

पं. विजयशंकर मेहता | Update - Aug 19, 2011, 03:16 AM IST

भारतीय संस्कृतीने एक महत्त्वाचा शब्द दिला आहे तो म्हणजे अपरिग्रह.

  • concept of aparigrah

    भारतीय संस्कृतीने एक महत्त्वाचा शब्द दिला आहे तो म्हणजे अपरिग्रह. याचा अर्थ जास्त संग्रहाची वृत्ती ठेवू नये. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ त्या गोष्टीतील आनंदच हरवून टाकतो हा त्यामागचा विचार आहे. जग पैशाच्या मागे पळते ते फक्त मौजमजा करता यावी म्हणून! आज खा-प्या, मजा करा, उद्या कुणी पाहिला. यामुळेच अनेक मोठे देश दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. भविष्याबद्दलच्या अनेक शानदार योजना असलेले पण जीवनाबद्दल दृष्टीच विकसित न झालेले अनेक देश आहेत. भारताने नेहमीच कोणतीही प्रगती किंवा विकासाला विरोध केला नाही, पण जे काही करायचे असेल त्यात जीवनातील उदात्तपणा उतरायला हवा हे भारतीय संस्कृतीने नेहमीच लक्षात घेतले. यामुळे आपण अपरिग्रहाला मोठा मान दिला आहे. संचय कमीच, पण मौलिक असावा. सध्या आपल्याकडे एवढ्या फालतू गोष्टींचा कचरा जमलाय की त्या ओझ्यानेच आपण लटपटत आहोत. अपरिग्रहाच्या भावनेचा आपल्यात जन्म झाला तर आपण स्वत:कडे एक विश्वस्त म्हणून पाहू. अपरिग्रहाची भावना मजबूत करण्यासाठी संतसंग करावा. जगाने आपल्याला डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा एखाद्या संताचा आपल्यावर पडलेला दृष्टिक्षेप जास्त महत्त्वाचा आहे. आपण जेवढा खरा फकीर शोधू, तेवढीच आपल्यात अपरिग्रहाची भावना मजबूत होईल आणि आपण अशांतीपासून दूर राहू.

Trending