Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | constipation-is-the-mother-of-diseases

मलावरोध नव्हे रोगांची खाण, उपाय काय ?

धर्म डेस्क, ऊज्जैन | Update - Jun 07, 2011, 02:06 PM IST

ही अतिशय सामान्य वाटणारी समस्या अनेक आजारांना जन्म देते

  • constipation-is-the-mother-of-diseases

    अनियमीत खाण्या पिण्याच्या सवयी आणि अनैसर्गिक जीवनशैलीमुळे अनेक आजार जन्म घेतात. असाच एक रोग आहे मलावरोध किंवा बद्धकोष्ठता. ही अतिशय सामान्य वाटणारी समस्या अनेक आजारांना जन्म देते. तसे पहायला गेले तर प्रत्येक आजाराचे कारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मलावरोधच आहे. मलावरोधाची समस्या आता लोकांच्या इतक्या परिचयाची झाली आहे की लोक याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. परंतु त्यांना माहित नाही की सतत मलावरोधाची समस्या राहिली तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. मलावरोधाने व्यक्तीची कार्यक्षमता घटते.
    उपाय
    रोज जेवल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दुधात उकळलेले मनुके चावून खा आणि त्यानंतर ते दूध प्राशन करा. काही दिवसांतच तुमची पोटाची समस्या दूर होईल.
    सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी 1 / 2 ग्लास पाणी प्या. मलावरोध दूर होईल.

Trending