Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | difference betn good and bad things

जाणून घ्या... सदगुण आणि दुर्गण ओळखण्याची कला

धर्म डेस्क | Update - Jul 13, 2011, 11:55 AM IST

सदगुण दुर्गुणांचा विषय येतो तेव्हा योग्य अयोग्य अशी वर्गवारी करणे कठीण जाते.

 • difference betn good and bad things

  भौतिक वस्तूंमधून चांगले आणि वाईट अशी निवड करणे सोपे असते. थोडी बुद्धी वापरली की आपल्याला ही निवड करता येते. परंतु सदगुण दुर्गुणांचा विषय येतो तेव्हा योग्य अयोग्य अशी वर्गवारी करणे कठीण जाते. आपले मन हे गुणावगुणांवर पांघरूण घालण्यात माहिर असते. या संसारी जगात वावरताना त्याग आणि वैराग्य अंगी बाणवणे अवघड असते. परंतु मनशांती हवी असेल तर याला पर्याय नाही, हेही तितकेच खरे आहे. साधारणपणे वैराग्य या शब्दाबद्दल चुकीचा अर्थ घेतला जातो.
  माणसाच्या अंगी वैराग्य असते तेव्हा तो त्याग करू शकतो. अन्यथा त्यागाला शोषणाचे स्वरूप येईल, सौदा बनेल. वैराग्य म्हणजे सा-या गोष्टी सोडून देणे असा अर्थ होत नाही. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा समाजाच्या हितासाठी, गरजूंच्या उन्नतीसाठी उपयोग करणे म्हणजे वैराग्य होय.
  दुस-यांचे चांगले करण्यात आपण जेवढे यशस्वी होऊ तेवढे आपण ख-या अर्थाने त्याग आणि वैराग्याच्या जवळ जातो. त्यामुळेच म्हटले जाते की आपल्यात वैराग्याची वृत्ती असावी. जेव्हा जेव्हा तुम्ही आतून अशांत असाल तेव्हा आपल्या वैराग्याची पातळी अंतर्मुख होऊन तपासून पाहा. वैराग्य असल्याशिवाय तुम्हाला ख-या अर्थाने मनशांती मिळूच शकत नाही.
  खरे सदगुण आत्मसात करण्यासाठी साहसाची आवश्यकता असते. आपल्यात वैराग्य असल्याशिवाय साहसी वृत्ती निर्माण होऊ शकत नाही. वैराग्य म्हणजेच सोडण्याची शक्ती. आसक्तीमुळे मनात भय निर्माण होत असते. त्यागी वृत्तीमुळे शक्ती मिळत असते. आपल्यात वैराग्य असेल तर अहंकार सोडण्याचे साहस येते. हे आध्यात्मिक समीकरण आहे. हे समीकरण आपण सदगुण आणि दुर्गुणाला लावू शकतो.

  follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending