Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Do This For Your Face

चेहर्‍यावरचे काळॆ डाग जाण्यासाठी करा हे घरगुती उपाय

धर्म डेस्क उजैन | May 15, 2012, 12:38 PM IST

  • चेहर्‍यावरचे  काळॆ डाग जाण्यासाठी करा हे घरगुती उपाय

तारूण्यात प्रवेश करताच बर्‍याच तरूण-तरूणींना तारूण्य पिटीकांचा त्रास होण्यास सुरूवात होते. उपचार घेऊन त्यापासून सुटका करून घेता येते पण तारूण्या पिटीका गेल्यानंतर चेहर्‍यावर राहणारे काळे डाग तसेच राहतात. अशा या काळ्या डागांपासून सुटका होण्यासाठी काही घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
उपाय -
- कोरडी हळद लिंबाच्या रसासोबत एकत्रकरून चेहर्‍यास लावल्यास डाग जाण्यास मदत होते.
- तेलकट चेहर्‍यावरील डाग़ जाण्याकरता चंदनाची पाउडर गुलाब पाण्यात एकत्र करून लाववी. हा उपाय विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायद्याचा ठरू शकतो.
- लिंबू , संत्राचे साल वाळवून त्याची पाउडर तयार करावी. गुलाबाच्या पाण्यात अथवा दह्यात एकत्रित करून डाग असलेल्या ठिकाणी लावल्यास निश्चित फायद्याचे ठरू शकते.
- टमाट्याचा रस लिंबाच्या रसात एकत्र करून बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. या रसाचा नियमित वापर चेहर्‍यावर लावल्यास काळे डाग हळू- हळू जाण्यास मदत होते.

Next Article

Recommended