Home | Jeevan Mantra | Dharm | do-this-task-in-morning-for-happy-and-peaceful-family-life

सुखी आणि शांत गृहस्थी जीवनासाठी सकाळी करावयाची कामे

धर्म डेस्क | Update - Jul 16, 2011, 05:30 PM IST

अशांत आणि ताणग्रस्त गृहस्थी जीवन कोणत्याही माणसाच्या मनावार आणि कामावर वाईट प्रभाव टाकते.

 • do-this-task-in-morning-for-happy-and-peaceful-family-life

  अशांत आणि ताणग्रस्त गृहस्थी जीवन कोणत्याही माणसाच्या मनावार आणि कामावर वाईट प्रभाव टाकते. यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्व आणि चरित्रातही नकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणूनच शास्त्रांनी गृहस्थ धर्मात सुखी जीवनासाठी मर्यादा आणि अनुशासन आवश्यक मानले आहे. शास्त्रात गृहस्थी जीवनासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या कामांविषयी मार्गदर्शन केल्याचे आढळते.
  गृहस्थी व्यक्तीने आळस त्यागून ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या आधी उठून धर्म आणि अर्थ या दोन्ही विषयांचा विचार केला पाहिजे. दिनचर्या निश्चित केली पाहिजे.
  शरीर आणि मनाची शुद्धी महत्त्वाची आहे. दात घासणे, शौच आणि आंघोळ करणे आवश्यक आहे. शरीरातून अनेक विषारी पदार्थ बाहेर पडत असतात. यापासून रोग उत्पन्न होतात. रोग मनाला कमकुवत बनवितात. आंघोळीने रोग, शोक, दु:ख दूर होतात. गंगा स्रान सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे.
  मनाच्या शुद्धीसाठी गृहस्थीने संध्या, उपासना, सूर्य पूजा, गायत्री मंत्राचे पठण, तर्पण, देव उपासना आदी उपाय केले पाहिजेत. धार्मिक दृष्ट्या पुण्य मिळावे म्हणून तर या गोष्टी आवश्यक आहेतच. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या ताणमुक्त आणि तंटामुक्त राहण्यासाठीही या गोष्टी आवश्यक आहेत.
  अशा रीतीने शरीर शुद्धी आणि देवस्मरणाच्या उपायाने अंत:करणशुद्धी होऊन शक्ती, ऊर्जा मिळते. आजच्या गतिमान जीवनात वेळ काढून गृहस्थींनी हे नियम आणि संयम पाळणे गरजेचे आहे. यामुळे घरातील सदस्यांनाही सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण मिळेल. गृहस्थीच्या मनात समन्वय, प्रेम, विश्वासाची भावना कायम राहील.

Trending