Home | Jeevan Mantra | Dharm | do-worship-of-shiva-parvati-life-will-be-happy

शिव पार्वतीची पूजा करा आणि जीवन सुखी बनवा

धर्म डेस्क | Update - Aug 02, 2011, 03:45 PM IST

श्रावण महिन्यात शिवभक्तीचे विशेष महत्त्व आहे.

  • do-worship-of-shiva-parvati-life-will-be-happy

    श्रावण महिन्यात शिवभक्तीचे विशेष महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक दिवशी शिवभक्तीची वेगळी विधी आहे. श्रावणात शुक्ल तृतियेला अर्थात यंदा 2 ऑगस्ट रोजी भगवान शिवाची पूजा पार्वतीसोबत करावी. कारण हा दिवस माता पार्वतीला अर्पण केलेला दिवस आहे. या दिवशी शिव-पार्वतीची एकत्र पूजा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते.
    यंदा आणखी एक सुखद योग म्हणजे ही तिथी मंगळवारी आली आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी शिव पार्वतीची पूजा श्रद्धेने केल्यास भगवान शिवाची आपल्याला कृपा प्राप्त होते.

Trending