Home »Jeevan Mantra »Junior Jeevan Mantra» Do Your Signature Like This And Become A Rich

सहीच्या खाली का मारावी पुर्ण रेष...

धर्म डेस्क उजैन | May 15, 2012, 13:23 PM IST

  • सहीच्या खाली का मारावी पुर्ण रेष...

आज बहुतांश लोक दिवस- रात्र एकत्रकरून पैसा कमवत आहेत.परंतु , त्या पैशांची बचत करू शकत नाही. जेव्हा पैशाची सगळ्यात जास्त गरज भासते त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
आपल्या पैशासंबधीच्या बाबतीत तुमचे सही महत्वाची भुमिका पार पाडत असते. सहसा पैशासंबधी सगळ्याच व्यवहारात प्रत्येक व्यक्ती सही अवश्य करत असते. जोतिष शास्त्रानुसार तुम्ही करत असलेले सही शुभ असल्यास पैशासंबधी कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण, चुकिचे अथवा दोषपुर्ण सही केल्याने तुम्हाला पैशासंबधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आर्थिक अडचणींपासून वाचण्यासाठी जोतिष शास्त्रात सही करण्यासंबधी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या सांगण्यात आलेल्या गोष्टींचे पालन केल्यास थोड्याच दिवसात पैशासंबधीच्या अडचणी दुर होण्यास मदत होईल.
तुम्ही भरपुर धन कमवता पण बचत करू शकत नसाल तर तुमच्या सहीखाली पुर्ण रेष मारा आणि त्याखाली दोन टिंब द्या. या टिबांची संख्या जसे जसे धन वाढेल तशी तशी वाढवत जा. लक्षात ठेवा जास्तीत जास्त सहा टिंब तुम्ही तयार करू शकता. हा उपाय करण्यासोबतच रोज आई- वडिलांच्या पाया पडून आर्शिवाद घ्या आणि सगळ्यांचा सन्मान करा.
तुमचे हस्ताक्षर तुमचे व्यक्तीत्व सांगत असते. म्हणून यासंबधी विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. धनवाढवण्यासाठी वरील सांगितलेले उपाय केल्यास लाभ अवश्य मिळण्यास मदत होईल.

Next Article

Recommended