आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:शी हे खोटे बोलणे सोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकारात्मक विचार किंवा दुस-याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही स्वत:शीच जे खोटे बोलता तो सर्वात मोठा खोटारडेपणा असतो. पुढच्या वेळी काही चांगले करण्याआधी आपल्या विचारांना प्राधान्य द्या. असे करण्यासाठी स्वत:शी हे खोटे बोलणे सोडून द्या...
० माझी स्वप्ने अशक्य आहेत - काही चांगले करण्यासाठी मनाचे ऐका. जोखीम पत्करा. तुमच्या स्वप्नांना भयमुक्त करा. रोज असे काही करा की येणारा काळ तुम्हाला धन्यवाद देईल.
० या बाबी कधीही सुधारू शकत नाहीत - प्रत्येकच बाबी हाताळू शकेल अशी एकही व्यक्ती नाही. समस्यांचा सामना करणे, नवीन काही शिकणे, नव्या बाबींचा स्वीकार करणे, तोडगा काढणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्या कोप-यात लपून बसल्याने अंधारावर मात करता येत नाही. आजचा दिवस वाईट आहे याचा अर्थ येणारा प्रत्येकच दिवस वाईट असेलच असा अजिबात नाही.
० मी दु:ख-यातना देणा-याच्या बरोबर असतो- जीवन छोटे आहे. स्वत:कडे पाहा. जर कोणी सातत्याने तुमचे वाईटच करत असेल तर त्याला सोडून द्या. असे केल्याने दु:ख होईल, परंतु असे करणेच योग्य राहील. दुस-याला आपले महत्त्व सांगण्यापेक्षा स्वत:चे महत्त्व ओळखून पुढे जा.
० मला सगळेच विनासायास मिळेल - आपण जसे बनू इच्छितो, आपण तसेच असतो. तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. तुम्हाला स्वत:च स्वत:चे रक्षण करावे लागेल. तुम्हाला स्वत:कडून काय हवे आहे, हे केवळ तुम्हालाच माहीत आहे. आपल्या आनंदाची किल्ली कुणा दुस-याच्या हाती देऊ नका. तुम्ही तुमचा आज आणि गेलेल्या कालची जेवढी जबाबदारी स्वीकाराल, तेवढाच येणारा उद्या सुख-समाधान घेऊन येईल.
० मी कुण्याही नवीन माणसाला भेटू इच्छित नाही- काळानुसार तुमचे मित्र आणि प्राधान्यक्रम बदलतील. काही संबंध संपुष्टात येतील तद्वतच काही नवीन संबंध जोडले जातील. नव्या संबंधांना महत्त्व द्या. नवीन शिकायला आणि नव्या आव्हानांना सामोरे जायला तयार व्हा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकेल, अशा व्यक्तीची भेट घ्या.
० जे सोडून गेले, त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही- काही लोक तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात, परंतु काही कारणांनी त्यांना तुमची साथ सोडावी लागते. त्या गोष्टीचे दीर्घकाळ ओझे वाहू नका. थोडा वेळच का होईना ते तुमच्या सोबत राहिले आणि बदल घडवून गेले, त्याबाबत धन्यता माना. त्यापैकी काही लोक पुन्हा तुमच्या जीवनात येतात तर काही पुन्हा कधीच येत नाहीत. तरीही तुम्ही समाधानी राहा.
० माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही- रुखरुख आणि स्वप्नविरहित जीवनापेक्षा ज्यातून तुम्हाला सतत काहीतरी शिकायला मिळाले अशा चुका केलेल्या असणे कधीही चांगले.