आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे लोक गुप्त विद्येचा वापर करून पैसा कमावतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीतील तृतीय आणि चतुर्थ स्थानात केतू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...
कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थानात केतू असेल तर...
ज्या लोकांची कर्क लग्न कुंडली आहे आणि तृतीय स्थानात केतू ग्रह असेल तर, त्या लोकांना भाऊ-बहिणीकडून फार त्रास सहन करावा लागतो. तृतीय स्थान भाऊ-बहिणीशी संबंधित आहे. कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थान कन्या राशीचे असुन स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या या राशीत केतू असल्यास व्यक्ती पराक्रमी बनतो. हे लोक गुप्त विद्येचा वापर करून पैसा कमावतात.
कर्क लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात केतू असेल तर...
ज्या लोकांची कर्क लग्न कुंडली आहे आणि चतुर्थ स्थानात केतू ग्रह असेल तर, त्या लोकांना आईकडून जास्त सुख मिळत नाही. चतुर्थ स्थान आई व भूमीशी संबंधित आहे. कर्क लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान तूळ राशीचे कारक स्थान आहे.केतूच्या प्रभावामुळे या लोकांना जमिनी संदर्भात त्रास होऊ शकतो. या लोकांना सामान्य सुखाच्या प्राप्तीसाठीही खूप कष्ट करावे लागतात.
हे लोक शारीरिक व्याधी आणि पैशामुळे राहतात नेहमी चिंताग्रस्त