आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effects Of Moon In Mithun Lagnas Kundli 5 6 Houses

...तर व्यक्ती होतो श्रीमंत, जर कुंडलीत असेल...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथुन लग्न कुंडलीत पाचव्या स्थानात चंद्र असेल तर....
ज्या लोकांची मिथुन लग्न कुंडली आहे, आणि पाचव्या स्थानात चंद्र ग्रह असेल तर, त्या व्यक्तीला संततीच्या बाबतीत अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता असते. कुंडलीतील पाचवे स्थान विद्या. बुद्धी, आणि संततीचे आहे. मिथुन राशीच्या लग्न कुंडलीत पाचवे स्थान तूळ राशीचे असून स्वामी शुक्र आहे. या स्थानात चंद्र ग्रह असल्यामुळे व्यक्तीला विद्या आणि बुद्धीच्या क्षेत्रात फायदा होतो. हे लोक विद्या आणि बुद्धीच्या जोरावर धन प्राप्त करतात.
मिथुन लग्न कुंडलीत सहाव्या स्थानात चंद्र असेल तर....
कुंडलीतील सहावे स्थान शत्रू व रोगाचे आहे. मिथुन लग्न कुंडलीच्या सहाव्या स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीला पैसा कमवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील सहावे स्थान वृश्चिक राशीचे आहे, आणि स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रहाच्या राशीत चंद्र असल्यास त्या व्यक्तीला शत्रूपासून धोका असण्याची शक्यता असते. अशी ग्रह स्थिती असणा-या लोकांनी सतत सतर्क राहावे.