आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Effects Of Rahu In Kark Lagnas Kundli 1 2 Houses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहू ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांच्या सौंदर्यात येते कमतरता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीतील प्रथम आणि द्वितीय स्थानात राहू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...
कर्क लग्न कुंडलीत प्रथम स्थानात राहू असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची कर्क लग्न कुंडली असेल आणि प्रथम स्थानात राहू असेल तर, त्या व्यक्तीच्या शारीरिक सुंदरतेत कमतरता राहते. कर्क लग्न कुंडलीत प्रथम स्थान कर्क राशीचे असून स्वामी चंद्र आहे. चंद्र राशीत राहू असल्यास त्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
हे लोक गुप्त योजना आखून पैसा प्राप्त करतात. या लोकांना प्रत्येक कामात यश प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम (कष्ट) करावे लागतात. या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागते.
कर्क लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात राहू असेल तर...
कर्क लग्न कुंडलीतील द्वितीय स्थान पैसा व कुटुंब कारक स्थान आहे. या स्थानात राहू असेल तर व्यक्तीला पैशाच्या बाबतीत नुकसान सहन करावे लागते. या लग्न कुंडलीत द्वितीय स्थान सिंह राशीचे असून स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि राहूला एकमेकांचा शत्रू मानले जाते. त्यामुळे शत्रूच्या राशीत राहू असल्यामुळे व्यक्तीला कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील अशा ग्रह स्थितीमुळे व्यक्तीच्या प्रतिष्ठेत वृद्धी होते. हे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात.
हे लोक सापडतात कायम अडचणीत; ज्यांच्या कुंडलीत....
हे लोक जगतात जास्त आयुष्य, ज्यांच्या कुंडलीत....
हे लोक पत्नीमुळे राहतात दु:खी, ज्यांच्या कुंडलीत...
हे लोक असतात खूप भाग्यशाली कारण यांच्या कुंडलीत....