आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु किंवा शनीच्या राशीत सूर्य असेल तर काय होते?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या सिंह लग्न कुंडलीतील पंचम आणि षष्ठम स्थानात सूर्य असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...
सिंह लग्न कुंडलीत पंचम स्थानात सूर्य असेल तर...
ज्या लोकांची सिंह लग्न कुंडली आहे आणि पंचम स्थानात सूर्य ग्रह असेल तर, या लोकांना मुलांकडून विशेष लाभ प्राप्त होतो. जन्म कुंडलीतील पंचम स्थान आपत्य व विद्या कारक स्थान आहे. सिंह लग्न कुंडलीत पंचम स्थान धनु राशीचे असून स्वामी गुरु आहे. गुरु ग्रहाच्या या राशीत सूर्य शुभफळ प्रदान करतो. अशा ग्रहस्थितीमुळे या लोकांना आत्मज्ञानाची प्राप्ती होते. हे लोक स्वभावाने रागीट असतात.
सिंह लग्न कुंडलीत षष्ठम स्थानात सूर्य असेल तर...
कुंडलीतील षष्ठम स्थान शत्रू व रोग कारक स्थान आहे. सिंह लग्न कुंडलीत षष्ठम स्थान मकर राशीचे असून स्वामी शनी आहे. या स्थानात सूर्य असल्यामुळे हे लोक शत्रूवर सहज विजय प्राप्त करतात. जीवनात आलेल्या अडचणी आणि संकटांवर हे लोक आपल्या परिश्रमाने मात करतात. हे लोक दिसण्यात फार सुंदर नसतात. या लोकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यात असते.