Home | Jeevan Mantra | Dharm | eight imp things for healthy life

सुख अणि प्रगतीसाठी जीवनात ही 8 कामे अवश्य करा

धर्म डेस्क | Update - Jul 13, 2011, 11:48 AM IST

शास्त्रांनुसार पाप हे मनुष्याच्या दु:खाचे आणि पतनाचे कारण आहे.

 • eight imp things for healthy life

  शास्त्रांनुसार पाप हे मनुष्याच्या दु:खाचे आणि पतनाचे कारण आहे. सुख अणि प्रगतीचे कारण पुण्य आहे. ब-याचदा मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पाप आणि पुण्याच्या व्याख्या स्वत:च्या सोयीने करीत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात पाप आणि पुण्याची चर्चा करायला वेळ तरी कुणाजवळ असते. यामुळेच मनुष्याला सुख दु:खाच्या फे-यात अडकून पडावे लागते.
  असे असले तरी प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे चांगुलपणा हा असतोच. शास्त्रांमध्ये मन, वचन आणि कर्माशी निगडीत अनेक पाप पुण्याचे वर्णन आहे. या बाबींची योग्य माहिती साधारणपणे आपल्याला नसते. येथे काही पाप पुण्याच्या गोष्टी शास्त्रांच्या अनुसार दिल्या आहेत. या बाबी प्रत्येक स्थळ, काळ आणि व्यक्तीला लागू आहेत.
  प्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं
  काले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्।
  तृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा
  सामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:।।
  सोप्या शब्दांत सांगायचे तर मानवाने मन, वचन आणि व्यवहारात पुढील आठ गोष्टी आचरणात आणावे.
  - सत्य बोलणे.
  - यथाशक्ती दान करणे.
  - गुरूप्रती सन्मान आणि नम्रता. गुण, वय किंवा अन्य बाबतीत आपल्यापेक्षा मोठा असलेल्याचा मान राखणे.
  - सर्वांप्रती दयाभाव.
  - मनात निर्माण होणा-या इच्छांवर संयम ठेवणे.
  - परस्त्रीबद्दल बोलणे किंवा ऐकणे टाळावे.
  - दुस-यांची धनसंपत्ती हडपण्याचा विचार न करणे.
  - प्राण्यांच्या प्रती अहिंसा भाव.
  धर्म आणि उपासनेच्या बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर पुढील कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे आगामी काळात जीवनमंत्रमध्ये या विषयांचा समावेश करता येईल.

  follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending