आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोडेसे कष्ट घ्या आणि निरोगी राहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यायाम करण्यासाठी जिममध्येच जावे असे काही नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळापत्रकात थोडासा बदल करावा लागेल.
जर तुम्हाला नियमित जिममध्ये जाता येणे शक्य नसेल तर काळजी करू नका. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही सोप्या पद्धती..
भरपूर पाणी प्यावे - उन्हाळ्यात विशेषत: डिहायड्रेशनची (निर्जलीकरण) समस्या उद्भवते. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी दर 40 मिनिटांनी पाणी जरूर प्यावे. दिवसभरात किमान 10 ते 12 ग्लास पाणी शरीराला आवश्यक आहे.
त्वरित स्ट्रेचिंग - सकाळी उठल्यानंतर काही मिनिटांनी संपूर्ण शरीराची स्ट्रेचिंग आणि फ्रीवेट (वजन न उचलता) व्यायाम करा. असे 15 ते 20 मिनिटे करावे. एका सत्रात 20 अँब्ज क्रंचेस, 20 पुश-अप्स आणि 20 स्क्व्ॉट्स (पाय मुडपून बसणे) करावे. एकावेळी तीन सेट्स करून विर्शांती घेतल्यानंतर पुन्हा सुरू करावे. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच सेट्स लावावे. अन्यथा अधिक थकवा जाणवायला लागेल.
10 मिनिटे विश्रांती - दुपारचे भोजन केल्यानंतर लगेचच काम करण्याची अनेकांना सवय असते. तथापि, 10 मिनिटे का होईना, जेवणानंतर थोडे चालणे शरीरासाठी आवश्यक आहे. चालताना मित्रासोबत फोनवरून बोलता येईल किंवा एक कप कॉफीचे सेवन करता येईल. याशिवाय आपल्या कार्यालयीन सहकार्‍यांशी गप्पाही मारू शकता.
प्रथिने आवश्यक - दिवसभर काम करत असताना शरीराला आवश्यक प्रथिनांची कमतरता भासते. सायंकाळच्या वेळी शरीराला प्रथिनांची गरज भासते. या वेळी प्रोटीन शेक घ्यावा किंवा सफरचंद खावे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळेल. प्रथिने न खाल्ल्यास शरीर निरोगी राहत नाही.
असे राहा ‘फिट अँड फाइन’
महिलांनो,पालेभाज्या खा आणि फिट राहा!
निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी दूध घ्यायला हवे
निरोगी वाढीसाठी सुवर्ण प्राशन गरजेचे
या मंत्राचा जप केल्याने कुटुंबातील सर्व सदस्य राहतील निरोगी