Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | family and ego problem

जाणून घ्या... घराला स्मशानाची कळा केंव्हा येते ?

धर्म डेस्क | Update - Sep 13, 2011, 02:23 PM IST

घराला आश्रम म्हटले आहे. परंतु मीपणाचा प्रवेश होताच त्याचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही.

  • family and ego problem

    परिवाराची निर्मिती केवळ समाज आणि कुळधर्म निभावण्यासाठी केली तर त्यात कर्तव्याची भावना अधिक असेल, परंतु प्रेम आणि ओलाव्याचा अभाव असेल. अशा परिवारात पति-पत्नीच्या नात्यात वचनाला महत्त्व असते आणि धर्माची आज्ञा मानून ते पाळले जातात. वंशाच्या प्रतिष्ठेचा विचार केल्यास त्यातून प्रेमभावना लोप पावते आणि मजबुरी माणसाला वरचढ ठरते. मात्र परिवारामधील सदस्य एक-दुस-यासाठी जगण्याची भावना ठेवत असतील, प्रेमाने राहू इच्छित असतील तर त्यांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवायला हवे. अहंकारामध्ये मीपण असते. परिवारात जोपर्यंत मीपणा असेल तोपर्यंत लोक एक-दुस-यासाठी जगणार नाहीत. मीपण खोलवर रुजलेले असते आणि त्याचा शोध घेणे कठीण असते. आपल्या आवडीची एखादी वस्तू मिळाली नाही तर न आवडणा-याही वस्तूत आपण समाधान मानतो. जसे पतीची भावना असते की पत्नीने आपले ऐकायला पाहिजे, यात मीपण दडलेले असते. असे झाले नाही आणि पती पत्नीला समानता देऊ लागला, तरीही मी माझ्या पत्नीला समानता देतो, अशी भावना असते. त्यातही मीपण असते. मीपण ही परिवारात मोठी अडचण असते. वडीलधा-यांनी त्यामुळेच शिकवण दिलेली आहे की मीपण नष्ट करण्याचा सोपा मार्ग आहे तो म्हणजे जीवनाला परमात्म्याच्या स्वाधीन करा. घरात देव असू द्या. यामुळे मीपण गळून पडेल. घराला आश्रम म्हटले आहे. परंतु मीपणाचा प्रवेश होताच त्याचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही.

Trending