आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकोने बांधली होती नव-याला पहिल्यांदा राखी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण शुध्द पौर्णिमेस राखी बांधावी असे शास्त्रात सांगितले गेले आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? सर्वात पहिल्यांदा राखी कोणी बांधली होती? या सणाबाबत खूप कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक निवडक कथा खालील प्रमाणे आहे...
एकदा देव आणि राक्षसांमध्ये बारा वर्षापर्यंत युद्ध सुरु होते. त्या युद्धात देवतांना विजय प्राप्त करणे अशक्य दिसू लागले. त्यामुळे घाबरलेले इंद्रदेव देवगुरु बृहस्पतीकडे मदत मागण्यासाठी गेले. गुरु बृहस्पतीने सांगितले की, युद्ध संपवणे आवश्यक आहे. त्यांचे हे बोलणे इंद्राची पत्नी 'शची'ने ऐकले तिने ठरवेले की, श्रावण शुक्ल पौर्णिमेला मी राक्षसुत्र तयार करेल. ते रक्षासुत्र इंद्रदेवाचे रक्षण करेल आणि त्यांना विजय प्राप्त करून देईल.
इंद्राच्या पत्नीने तयार केलेले रक्षासूत्र इंद्राने आपल्या मनगटावर बांधले. रक्षासूत्राच्या प्रभावाने देवता विजयी झाले. याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.
बहिणीने कशा पद्धतीने भावाला राखी बांधावी ?