Home | Jeevan Mantra | Dharm | first-time-wife-tied-to-the-husband-the-raksha-sutra

बायकोने नव-याला बांधली होती पहिली राखी...

धर्म डेस्क | Update - Aug 09, 2011, 06:39 PM IST

भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत रक्षाबंधनाविषयी माहिती मिळते.

  • first-time-wife-tied-to-the-husband-the-raksha-sutra

    रक्षाबंधन हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. काळाच्या ओघात या सणाला राखी किंवा राखी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. या सणाला कधीपासून सुरूवात झाली, याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. परंतु अतिशय प्राचीन काळापासून या सणाचे संदर्भ मिळतात. भविष्य पुराणात एक कथा आहे. या कथेत रक्षाबंधनाविषयी माहिती मिळते.
    एकदा देवता आणि दानव यांच्यात युद्ध झाले. देवतांना विजय मिळाला नाही. इंद्रदेव दु:खी होऊन देवगुरू बृहस्पती यांच्याकडे गेले. गुरू बृहस्पती म्हणाले की युद्ध थांबविले पाहिजे. यावेळी इंद्रपत्नी शचीने म्हटले की, 'मी एक रक्षासूत्र बनवेन. उद्या श्रावण पौर्णिमा आहे. या रक्षासूत्राच्या प्रभावाने तुमचे रक्षण होईल आणि तुम्हास विजय प्राप्त होईल.'
    इंद्राणीने व्रत धरून तयार केलेले हे रक्षासूत्र इंद्राने बांधून घेतले आणि राक्षसांवर विजय मिळविला.Trending