आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिलाटेस करा शरीर राहील सुडैल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिलाटेस हा व्यायामाचा जुनाच प्रकार आहे. मात्र, हा प्रकार सध्या खूप लोकप्रिय होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोनदेखील शरीर सुडौल ठेवण्यासाठी पिलाटेस करण्यास प्राधान्य देत आहे.
हा व्यायाम सर्व प्रकारच्या वयोगटातील लोक करू शकतात. यामध्ये श्वासोच्छ्वास प्रक्रिया आणि शरीराची ठेवण खूप महत्त्वाची आहे. पिलाटेस दोन प्रकारचा असतो. पहिला फ्लोअर पिलाटेस. तो जमिनीवर होतो. दुसरा रिफॉर्मर पिलाटेस. तो यंत्रावर होतो.
संपूर्ण शरीराचा व्यायाम - पिलाटेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यायाम शरीराच्या कोणत्याही एकाच भागावर नव्हे तर संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. हा व्यायाम कोअर स्ट्रेंथवर लक्ष केंद्रित करतो. कोअर मसल्स (स्नायू) पाठ, पोट आणि पेल्विक फ्लोअर यासारखे शरीरात खोल असलेले स्नायू आहेत. हे स्नायू शरीराची उठण्याबसण्याची, चालण्याची लकब योग्य ठेवण्यास मदत करतात. अशावेळी गळा आणि खांदे मोकळे होतात आणि शरीराचे इतर स्नायू व सांधे आपले काम करण्यासाठी मुक्त होतात.
कमी कष्टाच्या हालचाली - पिलाटेसच्या सर्व हालचाली कमी शारीरिक कष्टाच्या असतात. यामुळे सर्व सांध्यांची गतिशीलता वाढते. यामुळे स्नायूंमध्ये आकस निर्माण होत नाही. तणावमुक्त होऊन व्यायाम केला तरच त्यात परिपूर्णता येते.
इतर फायदे
> यामुळे मेंदू आणि शरीर मजबूत राहते.
> चुकीचा किंवा बिघडलेला बॉडी पॉश्चर सुधारण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी किंवा गर्भावस्थेनंतर शरीराचे काही सैल भाग घट्ट करण्यासाठी किंवा मेद कमी करण्यासाठी पिलाटेस साहाय्यभूत आहे.
> पिलाटेस खेळाडूंसाठीही फायदेशीर आहे.
> जे अतिर्शमाचा व्यायाम करू शकत नाहीत त्या लोकांसाठी पिलाटेस फायदेशीर आहे.
> पिलाटेसमुळे स्नायू बळकट होतात आणि त्यांची लवचीकता वाढते. तसेच सांध्यांची गतिशीलताही वाढते.
> या व्यायामात लक्ष जास्त केंद्रित करावे लागते. कारण संपूर्ण व्यायामात व्यक्ती मानसिकदृष्ट्या एकाग्र असेल तरच ती चांगला व्यायाम करू शकेल.
> शरीराच्या विविध अवयवांचा ताळमेळ कसा ठेवता येईल, हेसुद्धा यात शिकवले जाते.
> शरीराचे केंद्र म्हणजेच फासळ्यांचा खालचा भाग आणि प्युबिक बोनचा (यामध्ये पोट, पाठीचा खालचा भाग आणि कमरेचा समावेश आहे) वापर पिलाटेसमध्ये केला जातो.
20 व्या शतकात पिलाटेसची सुरुवात र्जमनीच्या जोसेफ पिलाटेस यांनी केली होती.
500 पेक्षा जास्त व्यायाम प्रकारांचा पिलाटेसमध्ये समावेश आहे.
काही धोकेही आहेत - प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय पिलाटेस व्यायाम करू नये. यामुळे दुखापतीचा धोका वाढू शकतो. गरोदर महिलांनी हा व्यायाम करू नये. विशाल वर्मा, फिटनेसतज्ज्ञ
PHOTOS : तंदुरुस्त राहण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही

PHOTOS : तंदुरुस्त राहण्यासाठी या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या
पोटाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय