आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या फळांचा रस आणि त्याच्या फायद्याबाबत

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी राहण्यासाठी फळांचा रस फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून कोणता ज्यूस कोणती समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे, याचा अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. जाणून घेऊया फळांचा रस आणि त्याच्या फायद्याबाबत..
सफरचंदाचा रस - सफरचंदाच्या रसातून मिळणारे अँसिटायकोलीन नावाचे रसायन मेंदू निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यप्रणाली चांगली राहते. सफरचंदाच्या ज्यूसचे सेवन केल्याने अल्झायमर म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याची शक्यता सुद्धा कमी होते, असे उंदरांवर करण्यात आलेल्या एका अमेरिकन संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधकांच्या मते दोन ग्लास (500 एमएल) सफरचंदाच्या ज्यूसचे दररोज सेवन करणे तरुणांसाठी फायदेशीर ठरते.
इतर फायदे : सफरचंदाचा रस पचनक्रिया आणि बाउल फंक्शन चांगले बनवण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर फायबर असल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित राहते.
डाळिंबाचा रस - कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, डाळिंबात आढळून येणारे रसायन शरीराच्या पेशींना दुखापतग्रस्त होण्यापासून रोखते आणि कॅन्सरग्रस्त पेशींना नष्ट करते. या संशोधनादरम्यान प्रोस्टेट कॅन्सरने पीडित असलेल्या सुमारे 50 पुरुषांशी चर्चा करण्यात आली. या वेळी त्यांना दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस (0.24 लिटर) पिण्याचा सल्ला देण्यात आला. सोबतच त्यांच्या प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन (पीसीए) च्या पातळीची सुद्धा तपासणी करण्यात आली. हा प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित प्रोटिन आहे. तज्ज्ञांच्या मते साधारणत: कॅन्सर असलेल्या रुग्णांमध्ये या प्रोटिनची पातळी 15 महिन्यांच्या आतच सामान्यांच्या तुलनेत दुप्पट होते. याउलट जे रुग्ण डाळिंबाचा रस नियमित सेवन करतात त्यांच्यात पीसीएची पातळी 54 महिन्यांनंतरच वाढण्यास सुरुवात होते.
इतर फायदे : डाळिंबाचा रस पिल्याने हृदयरोगांपासून बचाव होतो आणि एलडीएल कॉलेस्ट्रॉल (घातक कॉलेस्ट्रॉल) कमी होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आर्टरी वॉल्समध्ये फॅट गोळा होऊ देत नाहीत.
द्राक्षाचा रस - वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी द्राक्षाचा रस खूप फायदेशीर आहे. अमेरिकेत एक संशोधन करण्यात आले. त्यामध्ये चरबी असलेल्या सुमारे 100 लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. या लोकांना तीन गटात विभागण्यात आले होते. एका गटाला प्रत्येक जेवणापूर्वी अर्धा कप द्राक्षे खाण्याचा आणि दुसर्‍या गटाला एक ग्लास रस पिण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु तिसर्‍या गटाला असे काहीच सांगण्यात आले नाही. 12 आठवड्यांनंतर पुन्हा तिन्ही गटातील सदस्यांचा आढावा घेण्यात आला तेव्हा द्राक्षांचे सेवन करणार्‍या गटातील लोकांचे वजन इतर दोन गटांच्या तुलनेत कमी आढळून आले.
इतर फायदे : यामुळे ऊर्जा मिळते. द्राक्षांचा रस कॅन्सरला मारक आहे, परंतु अनेक औषधांचे परिणाम तो रोखू शकतो. त्यामुळे नेहमी याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
संत्र्याचा रस - संत्र्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हेस्पेरीडीन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगांची शक्यता कमी होते. अमेरिकन संशोधकांच्या मते जे पुरुष दररोज 500 मिली संत्र्याचा रस सेवन करतात त्यांच्या शरीराला 292 मिली ग्रॅम हेस्पेरीडीन मिळते. हा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत करतो.
इतर फायदे : यामुळे किडनी स्टोन्स तयार होत नाहीत. संत्र्याचा रस ‘क’ जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. कारण हे जीवनसत्त्व खास करून आंबट फळांमध्येच आढळते.
अननसाचा रस - अननसात आढळून येणारा ब्रोमेलेन एंझाइम जेवणात असलेली पोषक द्रव्ये पचण्यास साह्यभूत आहे. तज्ज्ञांच्या मते याचे रिकाम्यापोटी सेवन केल्याने ब्रोमेलेन एंझाइम अँटी-इंफ्लेमेटरी एजंटच्या रुपात काम करतो. त्यामुळे अर्थरायटिसने पीडित असलेल्या व्यक्तींची होणारी सांधेदुखी व सूज यापासून सुटका होते.
इतर फायदे : सर्दी-खोकला आणि कफ या समस्या दूर करण्यासाठी अननसाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.