Home | Jeevan Mantra | Dharm | ganesh chuthurthi, jeevan mantra, dhram desk

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश चतुर्थीला पूजा कशी करावी?

धर्म डेस्क | Update - Aug 29, 2011, 05:22 PM IST

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून या चतुर्थीस विनायक चतुर्थी, सिद्धीविनायक चतुर्थी आणि श्रीगणेश चतुर्थी या नावाने संबोधले जाते.

 • ganesh chuthurthi, jeevan mantra, dhram desk

  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून या चतुर्थीस विनायक चतुर्थी, सिद्धीविनायक चतुर्थी आणि श्रीगणेश चतुर्थी या नावाने संबोधले जाते. या दिवशी केलेले स्रान, उपास आणि केलेल्या दानाचे फळ नेहमीपेक्षा शंभर पटीने अधिक मिळते, असे म्हणतात. हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेश पूजन आणि व्रत असे करावे-
  विधी
  पहाटे लवकर उठून स्रान करावे. इच्छेनुसार सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. संकल्प मंत्रानंतर, षोडशोपचार पूजा करावी व आरती म्हणावी. गणेश मूर्तीला शेंदूर लावावा. मंत्र म्हणत २१ दूर्वांची जुडी वाहावी. २४ लाडूंचा नैवेद्य दाखवावा. यातील ५ लाडू मूर्तीसमोर ठेवावे. ५ लाडू ब्राम्हणांना द्यावे. उर्वरित लाडू प्रसाद म्हणून सर्वांना वाटावे. ब्राम्हणांना भोजनास बोलवावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण भोजन करावे.
  पूजेसमयी खालील मंत्रोच्चार करावे-
  दूर्वा वाहताना हे मंत्र म्हणावे-
  ऊँ गणाधिपाय नम:
  ऊँ उमापुत्राय नम:
  ऊँ विघ्ननाशनाय नम:
  ऊँ विनायकाय नम:
  ऊँ ईशपुत्राय नम:
  ऊँ सर्वसिद्धप्रदाय नम:
  ऊँ एकदंताय नम:
  ऊँ इभवक्त्राय नम:
  ऊँ मूषकवाहनाय नम:
  ऊँ कुमारगुरवे नम:
  या पद्धतीने पूजा केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील.Trending