आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, गायत्री मंत्राचा सोपा अर्थ आणि ७ शुभ प्रभाव

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक दृष्टीनुसार गायत्री देवीची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तसेच आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख गायत्री देवेच्या कृपेने प्राप्त होते. गायत्री देवीच्या साधनेमध्ये गायत्री मंत्राचे महत्व खूप आहे. या मंत्रातील चोवीस अक्षरे फक्त देवी-देवतांचे स्मरण करण्याचे बीज नसून, हे बीज अक्षर वेद, धर्मशास्त्रात सांगितलेल्या अद्भुत ज्ञानाचा आधार आहेत.
वेदांमध्ये गायत्री मंत्रापासून आयु, प्राण, प्रजा, कीर्ती, पशु, धन आणि ब्रह्मचर्य स्वरुपात मिळणारे हे सात फळ सांगितले आहेत.
जाणून घ्या गायत्री मंत्राचा सरळ, सोपा अर्थ -
ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।
ऊँ - परमेश्वर
भू: - प्राणस्वरूप
भुव: - दु:ख नाशक
स्व: - सुख स्वरूप
तत् - त्या
सवितु: - तेजस्वी
वरेण्यं - श्रेष्ठ
भर्ग: - पापनाशक
देवस्य - दिव्य
धीमहि - धारण करणे
धियो - बुद्धि
यो - जो
न: - आपल्या
प्रचोदयात् - प्रेरित करावे
सर्व शब्द जोडल्यानंतर अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.