Home | Jeevan Mantra | Dharm | get-desired-target-by-these-4-formula

व्यवहारकुशलतेची 4 सूत्रे आत्मसात करा : जीवन सफल बनवा

धर्म डेस्क | Update - Aug 01, 2011, 03:41 PM IST

ज्ञान, शरीर आणि धन या तीन्ही गोष्टी असल्या तरी मनुष्य जीवनात सफल होतोच असे नाही.

 • get-desired-target-by-these-4-formula

  ज्ञान, शरीर आणि धन या तीन्ही गोष्टी असल्या तरी मनुष्य जीवनात सफल होतोच असे नाही. यासोबतच माणसाकडे आणखी एक महात्वाचेगुण असणे आवश्यक आहे. व्यवहार कुशल असणे हे ते गुण होय.
  धर्मशास्त्रात सफल जीवनासाठी व्यवहार कुशलता अंगी बाणविण्याविषयी मार्गदर्शन आहे. या जगात 4 वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात असे गृहित धरून त्यांच्याशी कसे वागावे हे सांगितले आहे.
  - आपल्यासारखे गुण, क्षमता, आवड आणि स्वभाव असणा-या व्यक्तींशी मैत्री करावी. प्रेम, सहकार्याची भावना येथे असावी. कारण अशा लोकांशी आपली मैत्री लगेच होते.
  - आपल्यापेक्षा गुणाने, पदाने मोठे असणारे, आपल्यासाठी प्रेरणादायी असणारे आणि आपला आत्मविश्वास वाढविणारे लोक हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यांना सन्मान द्या. त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा.
  - आपल्यापेक्षा छोटे, मग ते गुण, ज्ञान, धन या बाबतीत छोटे असू शकतील, त्यांच्याशी व्यवहार करताना मनात करुणा भाव असू द्या. वाईट काम करणा-यांप्रतीही दयाभाव आणि सहानुभूती बाळगून व्यवहार करा, असे शास्त्रात म्हटले आहे. अशा लोकांचा तिरस्कार न करता, त्यांची उन्नती होईल, आपल्याप्रमाणेच ते गुणी आणि सुखी होतील यासाठी प्रयत्न करा. शक्य तेव्हा मदत करा.
  - दुर्जन अर्थात अतिशय वाईट कामे करणारे, पाप कर्म करणारे लोक हे चौथ्या प्रकारचे लोक होत. यांच्यात सुधारणा होण्याची थोडीही शक्यता वाटली नाही तर त्यांच्याप्रती मनात शत्रूभाव ठेवू नका. तटस्थ भाव मनात ठेवा. त्यांना भिऊ नका की त्यांच्या नाशासाठी प्रयत्न करू नका. न्याय व नीतीला धरून योग्य ते करा.
  अशा रीतीने जीवनात व्यवहार कुशलता आणल्यास आपले जीवन सफल होणे निश्चित शक्य आहे. स्रेह, विश्वास, सहकार्य आणि मनोबलाची ऊर्जा यामुळे जीवनात सर्वकाही शक्य होईल.

Trending