Home | Jeevan Mantra | Dharm | get-god-blessing-by-devotion

सांसारिक जीवनात आनंदाने जीवन जगायचे असेल तर...

धर्म डेस्क | Update - Sep 03, 2011, 04:05 PM IST

धर्मशास्त्रानुसार सर्व सुख आणि आनंद प्राप्त करण्याचा एकच शाश्वत मार्ग आहे - भक्ती.

 • get-god-blessing-by-devotion

  भौतिक जीवनात सुख आणि आंनद प्राप्त करण्यासाठी पद, प्रतिष्ठा, मान आणि ऐश्वर्य आदींची आवश्यकता असते. परंतु या सर्व गोष्टी माणसाला एकाच वेळी सहसा मिळत नाहीत. असा कोणता मार्ग आहे का की माणसाला स्थायी स्वरूपात अपार सुख मिळेल ?
  धर्मशास्त्रानुसार सर्व सुख आणि आनंद प्राप्त करण्याचा एकच शाश्वत मार्ग आहे - भक्ती. होय, भगवंताची भक्ती केल्याने, आपले मन त्याच्या चरणी लावल्याने काही क्षणातच आपल्याला ख-या आनंदाची प्राप्ती होते. या सुखापुढे भौतिक जगातील सुख आपल्याला तुच्छ वाटू लागते.
  अशा सुख देणा-या भक्तीसाठी भाव जरूरी आहे. भक्ती करण्यासाठी भाव आवश्यक आहे. याविषयी श्रीमदभागवतात स्वत: भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की...
  भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते।
  गन्धो धूप: सुमनसो दीपोन्नाद्यं च किं पुन:।।
  अर्थात मला अनेक प्रकारची भोग सामग्री चढविली तरीही मी संतुष्ट होऊ शकत नाही, परंतु एखाद्याने भक्ती-भावाने केवळ जल अर्पण केले तरी मी प्रसन्न होतो. याच भावनेने कोणी गंध, फूल, धूप, दीप आणि भोग लावल्यास मी प्रसन्न होतो.
  यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सांसारिक जीवनात आनंदाने जीवन जगायचे असेल तर कर्मासोबतच भावपूर्ण भक्ती आवश्यक आहे.Trending