Home | Jeevan Mantra | Dharm | get-sharp-mind-do-shiva-sun-worship

तेजस्वी बुद्धी हवी असेल तर करा शिव-सूर्य पूजा

धर्म डेस्क | Update - Aug 06, 2011, 01:26 PM IST

ही विधी नित्य केल्यास बल, बुद्धी, वीर्य आणि तेज वाढते.

  • get-sharp-mind-do-shiva-sun-worship

    धर्म शास्त्रांनुसार सप्तमी तिथीचे स्वामी सूर्यदेव आहेत. त्यामुळे या तिथीला सूर्याची उपासना केली पाहिजे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणा-या सप्तमी तिथीला भगवान शिव आणि सूर्यदेव यांची संयुक्त पूजा करण्याची प्रथा आहे. यंदा ही तिथी शनिवारी दि. 6 ऑगस्ट रोजी आहे.
    या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित करावे आणि भगवान शिवाची विधीपूर्वक पूजा करावी. शिवपिंडीवर बिल्व आणि धोत-याचे फूल अर्पावे. असे केल्याने सर्व प्रकारच्या रोगांचा नाश होतो. ही विधी नित्य केल्यास बल, बुद्धी, वीर्य आणि तेज वाढते.
    असे करण्यामागे सूर्योदयापूर्वी उठण्याची सवयही होते. केवळ सूर्योदयापूर्वी उठल्यानेही अनेक व्याधींचा नाश होतो.Trending