Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | ghomutr-sprinkling-is-growing-as-prosperity

गोमूत्र शिंपडल्याने येते समृद्धी

dharm desk, ujjain | Update - Jun 06, 2011, 05:01 PM IST

असे म्हटले जाते की गायीचे मुख अशुद्ध असते आणि शरीराचा मागील भाग शुद्ध.

  • ghomutr-sprinkling-is-growing-as-prosperity

    भारतीय संस्कृतीने गायीला माता म्हटले आहे. असे म्हटले जाते की गायीचे मुख अशुद्ध असते आणि शरीराचा मागील भाग शुद्ध. घरात गोमूत्र शिंपडल्याने आणि सकाळ संध्याकाळी घरात गायीच्या तुपाने दिवा लावल्याने वास्तूदोष दूर होतो. वातावरण शुद्ध बनते आणि घरातील सर्व सदस्य निरोगी बनतात.
    गायीच्या सेवेमुळे लक्ष्मीसह सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते. आपल्या शास्त्रांत म्हटले आहे की गायीच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो. त्यामुळे गायीच्या सेवेमुळे अक्षय्य पुण्य प्राप्त होते. गोमूत्र शिंपडल्याने घरातील हानीकारक रोगजंतू नष्ट होतात. लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. त्यामुळे गोमूत्र शिंपडल्याने समृद्धी वाढते.

Trending