Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | god and patience

देव केवळ त्यांनाच दर्शन देतो ज्यांच्याकडे ही संपदा आहे...

धर्म डेस्क | Update - Aug 08, 2011, 02:42 PM IST

प्रतीक्षा करण्याची कोणाचीच तयारी नाही. घाई करण्याच्या नादात माणूस धैर्य हरवून बसला आहे.

  • god and patience

    आज माणसाची गती वाढलेली आहे. प्रतीक्षा करण्याची कोणाचीच तयारी नाही. घाई करण्याच्या नादात माणूस धैर्य हरवून बसला आहे. भौतिक जीवनात घाई किंवा जल्दबाजी करण्यालाच गुण मानण्यात येत आहे. अध्यात्मात मात्र धैर्य हीच संपत्ती आहे. ज्यांच्याजवळ धीर आहे त्यांनाच परमेश्वरप्राप्ती होते. ज्याच्याकडे धीर आहे तोच आपल्या आजूबाजूलाही पाहू शकतो. जो घाईत आहे त्याच्याजवळ आजूबाजूला पाहायला वेळच नाही.
    दूरच्या लोकांची बात सोडा, जवळच्या नातेवाईकांकडे पाहायलाही यांच्याकडे वेळ नसते. जीवनात धैर्य असेल तर आपण आपली सेवा आणि मदतीने दुस-यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो. दुसरे अडचणीत असले की आपला स्वभाव आपल्याला त्यांच्या मदतीला धावून जाण्यास प्रेरित करतो. धैर्याचे आणखी एक गुण म्हणजे दुस-यांना सुखी पाहून आपले अंतकरणही प्रसन्न होते. अन्यथा आजकाल लोक आपल्या दुख:मुळे नाही तर इतरांच्या सुखामुळे अधिक दु:खी होतात.
    संयम नसेल तर तुम्हाला शांती कसे मिळणार ? आणि शांतीच मिळाली नाही तर परमात्मा कसा मिळणार ? आपल्यात संयम, धैर्य या गुणांची वृद्धी केल्यास आपल्यावर नक्कीच देव प्रसन्न होतो.

Trending